Monday, 6 July 2026

जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम ७ ते ९ जुलैदरम्यान गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे कार्यक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 


 

गडचिरोली, (जिमाका) दि. ६ : जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी श्रीकृष्णा शालीकराम धोटे (प्रबोधनकार), श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगर, अमरावती हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

- दि. ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – पीएमश्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर,   

      गडचिरोली.

- दि. ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – नगर परिषद सभागृह, आरमोरी.

- दि. ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता – नगर परिषद सभागृह, देसाईगंज.

या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये जादूटोणा व अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती, अंधश्रद्धेचे दुष्परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज, समाजात विवेकवादी विचारांचा प्रसार तसेच नागरिकांची कायदेशीर जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी या प्रबोधन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment