Tuesday, 7 July 2026

१० जुलै रोजी आरमोरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 


गडचिरोली, दि. ७ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित खाजगी कंपन्यांकडून सुमारे ५६० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १० वी, १२ वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या १८ ते ४० वर्षे वयोगटातील बेरोजगार उमेदवारांनी बायोडाटा व आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी gadchirolirojgar@gmail.com या ई-मेलवर किंवा ७८४३०४८२४९ व ८७८८२५७०१६ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment