गडचिरोली, दि. ५ (जिमाका) : महिलांच्या विविध समस्यांचे
निराकरण तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला
लोकशाही दिन सोमवार, दि.
१७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली
येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनात महिलांच्या विविध
विभागांशी संबंधित वैयक्तिक तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींबाबत लेखी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये विहित नमुन्यात सादर करावेत.
न्यायप्रविष्ट, सेवा विषयक किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले
जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या
संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment